Prakash Ambedkar | Sanjy Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. तसेच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे आमची शिवसेनासोबतची युती संपुष्टात आल्याचे सांगितले.
त्यानंतर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह पाच जागा देण्यास तयार झालो होतो. जर चर्चा पुढे गेली असती तर सहावी जागाही कदाचित त्यांना दिली असती. हे आम्ही तीन पक्षांनी ठरवलं होतं. काहीही झालं तरी प्रकाश आंबेडकर यांना आपल्याबरोबर घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं.” । Prakash Ambedkar | Sanjy Raut
अश्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत हे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत’, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “संजय राऊत आणखी किती खोटं बोलणार. तुमचे आणि आमचे विचार एक असतील तर मग आम्हाला तुम्ही बैठकीला का बोलवत नाही.
संजय, कितना झूठ बोलोगे!?
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी… pic.twitter.com/EMbHh6VFME
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 28, 2024
6 मार्च रोजी हॉटे फोर सिजन्समध्ये एक बैठक झाली. या बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधींना आमंत्रित का केलं नाही. आजदेखील एक बैठक आहे. या बैठकीलाही तुम्ही आम्हाला आमंत्रित केलेलं नाही. सिल्व्हर ओकच्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती,
हे आम्हाला ठावूक आहे. तुम्ही माझ्याविरोधात अकोल्यात उमेदवार देण्याची भूमिका मांडली होती. हे खरं नाही का? तुम्ही एकीकडे युती करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे सांगताय. दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे नियोजन करताय,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. । Prakash Ambedkar | Sanjy Raut