पुणे – शहरातील पत्रकारांचा दै. “लोकमत’तर्फे विविध विषयांसाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये
दै. “प्रभात’चे बातमीदार सुनील राऊत यांना “नागरी प्रश्न’ या विषयावरील लिखाणासाठी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
त्यांनी 16 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत “जन्म-मृत्यू दाखल्यांचा खेळखंडोबा’ ही विशेष भागांची मालिका दिली होती. या वृत्तांची दखल घेऊन राऊत यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी शहरातील अन्य नऊ पत्रकारांना विविध विषयांसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमतचे अध्यक्ष विजय दर्डा, महापौर मुरलीधर मोहोळ, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, खासदार वंदना चव्हाण, राज्यसभा सदस्य अमर साबळे आदी यावेळी उपस्थित होते.