आपल्या भागातील समस्या, प्रश्न आम्हाला पाठवा…, आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. “प्रभात’च्या माध्यमातून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…
हडपसर
पुणे-सोलापूर महामार्गावर भरणाऱ्या बाजारावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. परंतू, त्यानंतर पुन्हा रस्त्यावर बाजार भरू लागला असून विक्रेते रस्त्यावरच हातगाड्या घेऊन थांबतात, यातून अपघात घडण्याची शक्यता असून यावर पुन्हा कारवाई करण्यात यावी.
प्रविण हरपळे-9359258172
पुणे
कमला नेहरू उद्यानातील सांडपाणी चेंबरवरील झाकणे तुटली आहेत. यावरून चालणाऱ्यांच्या पायाला मोठी दुखापत होऊ शकते, ही झाकणे बदलणे गरजेचे आहे.
अनिल आगवणे-9822309973
वडगावशेरी
येथील पदपथावरच नो पार्कींगचा फलक ठेवण्यात आला असून ही सूचना कारचालकांसाठी की पदपथावरून चालणाऱ्यांसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करीम शेख-9923407861
शनिवार पेठ
शहरात सध्या स्वच्छ सर्वेक्षणाची धांदल उडालेली आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे ढीग हलविले जात आहे. परंतू, शहरातील पदपथांची अवस्था मात्र दयनीय झालेली आहे. शनिवार पेठेत पदपथ तुटलेल्या अवस्थेत ठिकठिकाणी दिसतात. संबंधीत विभागाने याकामातही लक्ष द्यावे.
योगेश मोदे-9881498402
पुणे
शहरातील जुने विद्युत दिव्यांचे खांब बदलण्यात येऊन त्याठिकाणी स्टायलीश खांब बसविण्यात आले. मात्र, जुने खांब नदीपात्रात टाकून देण्यात आले असून स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिम राबविणाऱ्या यंत्रणेचे याकडे लक्ष नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विद्रुप दिसणारे हे खांब हटविणे गरजेचे आहे.
अनिल आगवणे-9822309973