बारा वाजता मोर्चाला होणार सुरूवात
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूची यावरून देशभरात प्रचंड तांडव सुरू आहे. याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलतांना मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्ते बाबत माहिती दिली आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना या देशातून चले जाव असा इशारा देणारा राज ठाकरेंचा मोर्चा आहे. या मोर्चात भाजप, राष्ट्रवादी, स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते, देशप्रेमी जनता सहभागी होईल, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.