आपल्या भागातील समस्या आम्हाला पाठवा आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. प्रभात मधून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…
कामगार नगर
कामगारनगरमधील ड्रेनेज लाइन तुंबली आहे. गेले 20 दिवस, सर्व घाणपाणी, मैला वर येत आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरून लहान मुले आजारी पडू लागली आहेत. याबाबत तक्रारसुद्धा करण्यात आलेली आहे, पण त्याची दखल अद्याप घेतली गेलेली नाही.
राहुल जाधव – 9822229599
घोरपडी
बी. टी. कवडे रोडवर हातगाडी तसेच फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चार चाकी वाहने जाण्यास अडचणी होतात. पायी चालणाऱ्यांनाही रस्त्यावरून जावे लागत आहे.
परशुराम येल्लुर – 9767013330
वडगावशेरी
वडगावशेरीमधील नदीपात्राच्या घाटावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे पालिकेकडून स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात रोगराई पसरली आहे.
अक्षय गलांडे – 9921350909
धानोरी
धानोरीतील स.नं.67/1 ब, दत्तनगर येथील ड्रेनेज लाइन तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावरून वाहात आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे.
ज्ञानेश्वर कुंभार – 8208884735
भिंताडेनगर ते संस्कृती स्कूल नाल्यात नागरिक कचरा टाकतात त्यामुळे नाल्याच्या रस्त्यावर भटकी कुत्री व डुकरे यांचा वावर जास्त वाढला आहे. याप्रकारामुळे परिसरात अपघात घडू शकतात.
राजेंद्र भिंताडे – 9960244140