नवी दिल्ली – भारत व चीन यांच्यातील संबंध सुरळीत होण्याकरिता गंभीरपणे प्रयत्न चालू आहेत. सध्या दोन्ही देशांत “चार्ज डी- अफेअर्स, पातळीवर संबंध आहेत. त्याऐवजी राजदूत पातळीवर संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. 1962 पर्यंत असे संबंध होते. पंतप्रधान इंदिरा गांधी व परराष्ट्रमंत्री चव्हाण यांनी नुकतेच अनेक प्रसंगी असे जाहीर केले आहे, की संबंध सुरळीत करण्यास भारत तयार आहे, पण चीनकडून त्यास प्रतिसाद नाही.
सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे उद्घाटन
पुणे – सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे हस्ते सोलापूर येथे झाले. ही गाडी सोलापूर-पुणे-मुंबई धावेल.
सहकारी चळवळीसाठी माणसे चांगली असणे जरूर
पुणे – लोकशाही समाजवाद असे वेळो वेळी म्हणण्यापेक्षा सहकारी समाजवाद हा शब्दप्रयोग संयुक्तिक वाटतो. त्यातूनच सहकाराच्या चळवळीला गती येते व ती चळवळ वाढण्यासाठी नेतृत्व, वातावरण व माणसे चांगली असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती त्र्यं. शि. तथा बाळासाहेब भारदे यांनी येथे केले.
“डायनोरा’ टीव्ही पुण्यात विक्री
पुणे – “डायनोरा’ टीव्हीची विक्री पुण्यामध्ये सुरू झाली. तामिळनाडू सरकारच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वात अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या मंडळींनी या टीव्हीची निर्मिती केली आहे. टीव्हीची किंमत 3300 ते 4500 रुपयांपर्यंत आहे.