मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तामिळ अभिनेता सूर्यासोबत ती काम करताना दिसणार आहे. ‘कंगुवा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच सूर्याने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या या पोस्टरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय या चित्रपटाचा दमदार टीझर देखील शेअर केला आहे.
एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. एक माणूस घोड्यावर बसलेला दाखवला आहे आणि त्याचा चेहरा मुखवटाने झाकलेला दिसत आहे. त्यासोबतच गरुड आणि कुत्रेही अॅनिमेटेड व्हर्जनमध्ये दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट अॅक्शनने भरलेला असून 3डीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट 10 भाषांमध्ये पाहता येणार आहे.
Sheer joy working with Siva & Team on this mighty saga. Happy to share the title look of #Kanguvahttps://t.co/7TiAfM2fTE@directorsiva @ThisIsDSP @kegvraja @DishPatani @vetrivisuals @SupremeSundar_ @StudioGreen2 @UV_Creations @saregamasouth pic.twitter.com/pcdKo99wAj
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) April 16, 2023
या चित्रपटात सूर्या हा ‘कंगुवा’ ही भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अजून समोर आलेली नाही. परंतु लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली जाऊ शकते. मात्र सूर्या आणि दिशा या दोघांच्या चाहत्यांना आशा आहे की हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री दिशा पटानीने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘एम. एस धोनी’ या चित्रपटामुळे दिशा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिने थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एंट्री केल्याने चाहते देखील तिचा आगामी चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत.