कोल्हापूर | 1563 जणांचा वीज पुरवठा होणार खंडीत

कोल्हापूर – सांघिक व प्रादेशिक कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकी वसुली मोहिम सुरू असून जिल्ह्यातील वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील 1 हजार 563 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

1 एप्रिल 2020 पासून एकही वीज बील न भरलेल्या 1 हजार 563 ग्राहकांकडे 15 कोटी 52 लक्ष रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येणार आहे.

कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बील भरून सहकार्य करा करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.