शिक्रापूर- लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी शिक्रापूर येथील पॉवर ग्रीड कंपनीकडून गावातील पाचशे कुटुंबीयांना महिनाभर पुरेल असा किराणा देण्यात आला आहे. येथील जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडे शिक्रापूर, सणसवाडी, कासारी, वाडागाव, कोरेगाव भीमा भागातील गरीब व मजुरांना कोरोनामुळे रोजगार उपलब्ध नाही. त्यानुसार कंपनीच्या वतीने पाचशे कुटुंबीयांना तांदूळ, डाळ, तेल, बेसन, पोहे, रवा, मीठ, मसाले, साबण आदी गरजेच्या वस्तूंचे कीट बनवून वाटप करण्यात आले आहे.
यावेळी पॉवर ग्रीड कंपनीचे उप महाप्रबंधक अजय कापसे, मुख्य प्रबंधक प्रमोद चिमणकर, ज्ञानेश्वर बदे, माजी उपसरपंच आबाराजे मांढरे, ग्रामपंचायत सदस्या मीना सोंडे, माजी चेअरमन विठ्ठल सोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे, सूरज सोंडे उपस्थित होते.