जुन्नर (प्रतिनिधी) : वास्तविकता सुशिक्षित बेरोजगार युवक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळलेले दिसून येत आहेत. मात्र लाखो रुपयांचा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन हे शेतकरी अगदी कासोटीने हि शेती करत असतात मात्र पॉलीहाऊस शेती ही मोठी जिकरीची असून त्यात कष्टा बरोबरच अंतर्गत खर्च देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो.
मात्र सध्या परिस्थितीत पॉलीहाऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुल शेतीला प्राधान्य देणार कोण आणि माल मार्केट मध्ये जाणार तरी कसा हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना लाखो रुपयांची फुले अक्षरशः तोडून फेकून द्यावी लागत आहे.
परिणामी एवढ्या मोठ्या नुकसानीत कर्जाचे हप्ते फेडायचे तरी कसे आणि आपल्या कुटुंबाला सांभाळायचे तरी कसे हे एक मोठं कोडं शेतकऱ्यांच्या समोर उभे असतांना मायबाप सरकारने आमच्याकडे देखील लक्ष द्यावे व आम्हाला देखील या संकटातून मुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे