नगर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही संस्थेमध्ये थेट नाहीत मात्र, त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या ह्या सरकारणे बदलली गेली, शरद पवार व्यक्ती दोषी कसे? ते दोषी असतील तर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र कांगो यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
नगर येथे आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे, शंकर नालपल्ली, सुभाष लांडे, हर्षद शेख, अंबादास दौंड, नीलिमा आदी उपस्थित होते.दरम्यान,महाराष्ट्रमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षला 16 जागा मिळत आहे. कन्हैयाकुमार हे महाराष्ट्रामध्ये येत असून त्यांची नगरमध्ये जाहीर सभा होणार आहे.