शहराला मिळणार दिवसाआड पाणी 

नगर – नगर शहराला पाणीपुरवठा करणारी योजना दुरुस्तीच्या कामासाठी शटडाउन घेण्यात येणार असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागास एक दिवस विलंबनाने पाणीपुरवठा होणार आहे.

शनिवार दि. 12 रोजी पाणी योजनेवरील महत्वाच्या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहराला पाणीवितरण करणाऱ्या टाक्‍या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवार (दि.12) रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर व स्टेशनरोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा होवू शकणार नाही.

परिणामी रविवार (दि.13) रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या भागास म्हणजेच झेंडीगेट, मंगलगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्‍टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसिपल हाडको, इत्यादी परिसरात महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार (दि.14) रोजी करण्यात येणार आहे. तसेच सोमवार (दि.14) रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर लालटाकी, दिल्लीगेट नालेगाव, चितळेरोड, ख्रिस्तगल्ली, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.