ओडिशामधील नीट परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली – वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची “नीट’ ही प्रवेश परीक्षा फणी चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात पुढे ढकलली आहे. मात्र उर्वरित सर्व राज्यांमध्ये नीट परीक्षा आज (रविवार, 05 मे ) ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडली आहे.
सर्व राज्यांप्रमाणे आज ओडिशा राज्यातील 7 केंद्रावर नीट परीक्षा होणार होती. परंतु परीक्षा पुढे ढकलल्याने पुढील सुधारित वेळापत्रक लवकरच एनटीएकडून जाहीर केले जाणार आहे. इतर राज्यात नीट परीक्षा आज दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडली.

फणी वादळाच्या तडाख्यानंतर रेल्वे, विमान आणि वाहतुकीच्या इतर सेवा खंडीत झाल्याने नीट परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप होऊ शकतो, यामुळे एनएसयुआय व इतर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता ही परीक्षा फक्त ओडिशा राज्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.