सोशल मीडिया एक्‍सपर्ट नेमण्यास स्थगिती द्या

पिंपरी – महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी सोशल मीडिया एक्‍सपर्ट नेमण्याची महापालिका प्रशासनाला का गरज वाटत आहे? महापालिकेचा संगणक विभाग हे काम करण्यास असमर्थ आहे का? तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत टेक महिंद्रा कंपनीला मोठ्या रकमेचे काम दिलेले आहे, संबंधित कंपनी हे काम करू शकत नाही का? असे विविध प्रश्‍न स्थायी समिती सदस्य मूयर कलाटे यांनी उपस्थित केले आहेत.

त्यांनी सोशल मीडिया एक्‍सपर्ट नेमण्यास स्थगिती देण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेत 2017 पासून विविध विषयांसाठी आजतागायत अनेक जणांची सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे.

चऱ्होली येथील वीरमाता पूल ते खडकवासला वस्ती हा 30 मीटर विकास आराखड्यातील विकसित करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ सल्लागाराने प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता त्या कामाचे अंदाजपत्रक केल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यामुळे त्यांची सल्लागार पदावरून उचलबांगडी करण्याची महापालिकेवर नामुष्की ओढवली. अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांचा महापालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांवरील विश्‍वासाला तडा जात आहे. आयुक्तांनी अशा प्रकारे काम करणाऱ्यासल्लागारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच, सल्लागारांची नेमणूक तत्काळ थांबवावी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here