उद्‌घाटन झाले, परंतु कामे अपूर्ण

पिंपरी – पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्‌डाणपुलाच्या जवळील मोकळया जागेत महापालिकेच्या वतीने गाळे उभारण्यात आले आहे. फूल बाजाराचे उद्‌घाटनही घाई-घाईत करण्यात आले. परंतु अजूनही येथील काही कामे अर्धवट आहे. व्यापारी पुढील आठवडयात पालिकेने दिलेल्या गाळयात दुकाने थाटतील. मात्र, काही कामे अर्धवट आहेत. या फूल बाजारात स्वच्छतागृह, पाण्याची सोय, वीज जोड, सुरक्षेतसाठी प्रवेशद्वार असे विविध कामे अपूर्ण आहेत. नुकत्याच झालेल्या व्यापाऱ्याच्या बैठकीत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. बाजार समितीकडून बाकी कामे पूर्ण झाल्यानंतर ते स्थलांतरित करण्यात येतील.

पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौक येथील रस्त्यावर फूल बाजार भरतो. पुरेशी जागा नसल्याने आणि पावसामुळे येथील विक्रेत्यांचे खूप हाल होतात. त्याचप्रमाणे पार्किंग अभावी ग्राहकही येथे कमी प्रमाणात येत असल्याने पर्यायी जागेची मागणी पिंपरी-चिंचवड फुलवाले आडते असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. नवीन सुरु होत असलेल्या या फूल मार्केटचे नुकतेच उद्‌घाटन झाले आहे. ते बाजार समितीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हे गाळे अर्धवट आहेत.

हे गाळे खूपच कमी जागेत बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना त्यांची फुले ठेवण्यास अडचणी निर्माण होणार आहे. गाळे आणि केवळ ओटा करण्यात आला आहे. मात्र, परिसरातील अस्वच्छता, विजेचा अपुरा पुरवठा यामुळे हे गाळे अर्धवट अवस्थेत आहेत. 30 ते 32 दुकानदारांसाठी 27 गाळे काढण्यात आले असल्याने व्यापाऱ्यामध्ये मोठी तडजोड करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यापाऱ्याच्या बैठकीत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. बाजार समितीकडून बाकी कामे पूर्ण झाल्यानंतर ते स्थलांतरित करण्यात येतील. फुल बाजारात येणारी शेतकऱ्यांना सोयीस्कर जाण्यासाठी जागा व विश्रांतीची सोय नाही. परिसरातील फरशा व कोबा करणे महत्त्वाचे होते.

दुसरीकडे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, तात्पुरत्या स्वरुपात फूल विक्रेत्यांना ते गाळे देण्यात आले आहेत. तेथे बहुउद्‌देशीय पार्किंग होणार आहे. तेथे त्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. तर व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने बाजार समितीकडे गाळे हस्तांतर केले आहे. त्यानंतर उरलेले कामे पूर्ण झाल्यानंतर व्यापारी तेथे स्थलांतरित होतील. बाजार समितीकडे पाठपुरावा सुरु आहे. पाण्याचे कनेक्‍शन आणि वीज जोडणीचा पोलही तेथे बसविण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)