राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई: महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा गोंधळ काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. परंतु राष्ट्रवादीने देखील बहुमताची जुळवाजुळव होत नसल्याचे पत्र राज्यपालांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या संदर्भातील अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी शिफारस केली आहे.

त्यामुळे जर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे स्पष्ट होत आहे.

त्या पार्शवभूमीवर दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्‍स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.