पोर्तुगालमध्ये लॉकडाऊनमध्येच अध्यक्षपदासाठी निवडणूक

लिस्बन – पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत. त्यामुळे आज केवळ मतदान करण्यासाठी तसेच अत्यावश्‍यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे.

पोर्तुगालची लोकसंख्या 1 कोटी आहे. तर तेथील करोना बाधितांची संख्या 13 हजार इतकी आहे. आतापर्यंत 200 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा, दुकाने आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. नागरिकांना अत्यावश्‍यक कामासाठीच घरातून बाहेर पडण्यासाठी परवानगी दिली गेली असल्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची टक्केवारी जेमतेम 25 टक्केच राहण्याची शक्‍यता आहे.

2016 मध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी 49 टक्के इतकीच होती. गेल्या वेळी अध्यक्ष मार्सेलो दुएर्ते रिबेलो दी सोसा हे 52 टक्के मते मिळवून अध्यक्षपदी निवडून आले होते. या निवडणूकीत आतापर्यंतच्या मतदानाच्या कलानुसार मार्सेलो दुएर्ते रिबेलो दी सोसा हे 70 टक्के मते मिळवून पुन्हा अध्यक्षपदी निवडून येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.