मुंबई – अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती ‘राज कुंद्रा’ला अटक करण्यात आली.
राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलमधील सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही नाव आरोपी म्हणून समोर आलं.
Property Cell of Mumbai Police Crime Branch has summoned actress Sherlyn Chopra asking her to appear before it for questioning today in connection with the porn film production case in which businessman Raj Kundra was arrested: Mumbai Police pic.twitter.com/6J5PjhzrW8
— ANI (@ANI) August 6, 2021
आणि याच प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आता, अभिनेत्री शर्लिन चोपडाला मुंबई पोलिसांकडून समन्स वाजवण्यात आला आहे. शर्लिनची आज (दि. ६) मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून चौकशी केली जाणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने मालाड पश्चिम भागात असलेल्या मढ गावातील एका बंगल्यावर कारवाई केली होती. पॉर्न चित्रपटांचं चित्रीकरण केलं जात असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, शर्लिनला समन्स बजावण्यात आलेलं असताना. तिने अटकेच्या भीतीने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने शर्लिनची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आज शर्लिनला चौकशीसाठी हजार राहण्यास सांगितलं आहे.