भोपाळ – मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यांची तुलना थेट वॉशिंग्टनच्या रस्त्यांशी केली होती. खरंतर तुलना नाहीच तर त्यांनी थेट मध्य प्रदेशातील रस्ते वॉशिंग्टनच्या रस्त्यांपेक्षा उत्तम असल्याचे म्हटले होते. यावरून आता मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते अरुण सुभाष यादव यांनी भोपाळमधील भारत टॉकीज समोरचा फोटो ट्वीट करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
“मध्य प्रदेश की सड़कें अमेरिका से अच्छी हैं” आपको याद है यह वक्तव्य हमारे मुख्यमंत्री शिवराज सिंह जी ने दिया था ।
यह फ़ोटो भोपाल स्थित भारत टाकीज के सामने की है । pic.twitter.com/ZCDftOTxWH— Arun Subhash Yadav 🇮🇳 (@MPArunYadav) August 5, 2021
त्यांनी ट्विट केले आहे की,’मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले असल्याचे म्हटले होते. यावरूनच आता अरुण सुभाष यादव यांनी रस्त्याची चाळण झालेला थेट मध्य प्रदेशातील रस्ते वॉशिंग्टनच्या रस्त्यांपेक्षा उत्तम असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याच भूमीत त्यांनी हे विधान करण्याचं धाडस केलं होतं.’ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
दरम्यान, हा फोटो सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या रस्त्यांचा फोटो शेअर करत नेटकरी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचावर टीका करत आहे.