Pooja Sawant : मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून पूजा सावंत (Pooja Sawant) हिचं नाव घेतलं जातं. पूजा सावंत लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकदा तिला विचारला गेला होता. काही महिन्यांपूर्वी तिने साखरपुडा केला असल्याच्या चर्चा देखील झाली होती. त्यावेळी तिने आपण साखरपुडा केला नसल्याचे म्हटले होते.
मात्र, त्यानंतर तिने एक फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करून, आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचे म्हटले. सिद्धेश चव्हाणशी (Siddhesh Chavan) लग्नगाठ बांधणार असल्याचे अभिनेत्रीने यावेळी सांगितले. इतक्या वर्षानंतर पूजाचा जोडीदार अखेर समोर आल्यानंतर तिच्या फॅन्सला देखील आनंद झाला आहे. आता पूजाने सोशल मीडियावर तिच्या भावी नवऱ्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर सिद्धेशबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “तुझ्या येण्याने माझी वंडरलँड आणखीनच रंगीत झाली आहे.’ पूजाने ही पोस्ट सिद्धेश चव्हाणला टॅगही केली आहे. पूजाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदापर्ण केलं. ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटात तिच्याबरोबर अंकुश चौधरीची मुख्य भूमिका होती. तसेच ‘नीलकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’, ‘आता गं बया’सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.