अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा कालच जाहीर झाल्या असल्या तरी गुजरातच्या जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी या राज्यात ऑक्टोबर महिन्यात सी वोटरने जनमत चाचणी घेतली होती. त्यानुसार राज्यातील जनतेच भाजपलाच पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून विशेष म्हणजे यंदा प्रचंड हवा निर्माण करणाऱ्या आम आदमी पक्षाला लोकांनी तिसऱ्या स्थानावर टाकले आहे.
आतापर्यंत शांततेत काम करत असलेला कॉंग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या जागा गेल्या वेळेपेक्षाही निम्म्याने घटणार आहेत.
22807 लोकांशी बोलणी करून हा कौल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून त्यात किंचित एरर असू शकतो असे नमूद करण्यात आले आहे. गुजरातच्या विभागवार जागा, त्यात कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळणार, किती टक्के मिळणार असे तपशीलवार सांगण्यात आले आहे.
असे असेल संभाव्य चित्र
एकूण जागा 182
भाजप: 131 ते 139
कॉंग्रेस: 31 ते 39
आप: 7 ते 15
इतर: 02