ऍडलेड :– दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज महंमद नवाज एकाच चेंडूवर दोनवेळा बाद झाला. मात्र, त्याला जर आयसीसीच्या नियमातील तरतूद माहिती असती तर तो बाद झालाच नसता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमांत होत असलेले बदल माहिती नसणे नवाजसाठी नुकसानकारक ठरले.
या सामन्यात नवाजने 28 धावांची खेळी करताना संघाचा डाव सावरण्यात मोलाचा वाटा घेतला होता. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीच्या चेंडूवर नवाजने स्वीप मारण्याचा केलेला प्रयत्न फसला. त्यावेळी शम्सीने पायचितचे अपील केले. पंचांनीही त्याला बाद घोषित केले. मात्र, हा निर्णय होण्यापूर्वीच नवाज धाव घेण्यासाठी धावला व क्षेत्ररक्षकाने त्याला धावबाद केले.
नवाजने पायचितच्या निर्णयाविरुद्ध डीआरएस घेतला नाही. त्याला वाटले की तो धावबादही झाला आहे. त्यामुळे डीआरएसचा काही उपयोग होणार नाही. मात्र जर त्याने डीआरएस घेतला असता तर त्याला धावबाद ठरवता आला नसते.
#PunjabKings : पंजाब किंग्ज संघाचे मोठे फेरबदल; मयंकचा पत्ता कट तर धवन…
नियमानुसार ज्यावेळी पंच फलंदाजाला बाद देतो त्याचक्षणी तो चेंडू डेडबॉल होतो. त्यामुळे नंतर पंच त्याला धावबाद देऊ शकत नाहीत. मात्र, नवाजला नियमच माहिती नसल्याने त्योन डीआरएस न घेता मैदान सोडले. अर्थात हा सामना पाकिस्तानने जिंकल्यामुळे नवाजने त्याबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.