बारामती (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारकडून ओबीसींची होत असलेली ससेहोलपट थांबविण्यासाठी ओबीसी सेवा संघ आक्रमक झाला असून आगामी रणनीती ठरविण्यासाठी (दि.८ जानेवारी) रोजी दौंड येथे चिंतन शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बारामती तालुकाध्यक्ष दादासाहेब टेंगले यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राजकारण होत आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे. या पार्श्वभूमीवर दौंड येथील चिंतन शिबिरात राज्यव्यापी लढा उभा करण्याची रणनीती आखली जाणार आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. हनुमंत सुतार,प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब देडे, युवक प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब टेंगले, संपर्कप्रमुख नितीन मासाळ आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
युवकचे प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे. सभासद नोंदणी अभियानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दौंड शहर अध्यक्ष रवी बंड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.