Nashik IT Raid – नाशिकमधील काही सराफ व्यवसायिकांवर आयकर विभागाकडून धाडी टाकत दुकाने आणि घरांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सराफ व्यावसायिकांनी व्यवहारांची माहिती लपवण्याचा संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आज नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवर धाडी पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात छापेमारी केली जात आहे.
आज सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहेत. तब्बल 39 वाहनांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून अधिकारी कार्यरत आहे.
नाशिकमधील काही सराफ व्यावसायिकांची दुकाने आणि घरांची तपासणी केली जात आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाची ही एक मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. आता या कारवाईत पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.