Sanjay Shirsat | Uddhav Thackeray : लोकसभा मतदानानंतर सांगलीत कॉंग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांंसाठी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला तेथे महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणारे विशाल पाटील व कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम उपस्थित होते. त्यावरून सांगली जिल्ह्याचे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी कॉंग्रेसवर जोरदार आगपाखड केली आहे.
कॉंग्रेसने आमचा विश्वासघात केला असून आम्ही विधानसभेला त्यांना धडा शिकवू असे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटले आहे. त्याचा दाखला देत शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी शिवसेनेला कॉंग्रेसबरोबर फरफटत नेले त्याचे परिणाम त्यांना आता भोगावे लागत आहेत. हीच भूमिका आधीच घेतली असती तर शिवसेना फुटली नसती. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असे टीकास्त्रही शिरसाट यांनी सोडले आहे.