Sharjah Masters Chess Tournament 2024 : भारताचा अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने शारजाह मास्टर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत इराणच्या बर्दिया दानेश्वरसोबत (GM Bardiya Daneshvar) बरोबरी साधली, जो या स्पर्धेचा विजेता ठरला. तर, अर्जुन (Erigaisi Arjun) टॉप 10 मध्ये राहिला. टेबलमधील अव्वल चार खेळाडूंमध्ये 6.5 गुणांची बरोबरी होती परंतु दानेश्वरने सर्वोत्तम टायब्रेक स्कोअरसह इतर सर्वांवर मात करत आपले पहिले विजेतेपद पटकावले.
टॉप-10 मध्ये एकमेव भारतीयाचा समावेश…
रशियाच्या वोलोदार मुर्झिननं दुसरे, अमेरिकेच्या सॅम शँकलँडने तिसरे आणि उझबेकिस्तानच्या शमसिद्दीन वाखिडोव्ह यानं चौथे स्थान पटकावले. यानंतर, आठ खेळाडूंमध्ये बरोबरी झाली आणि अर्जुन सहा गुणांसह अव्वल-10 मध्ये समाविष्ट असलेला एकमेव भारतीय राहिला. या भारतीय खेळाडूने चार विजय, चार अनिर्णित आणि एक पराभव नोंदवला. तो गुणतालिकेत 7 व्या स्थानावर राहिला.
Casablanca Chess Variant Tournament 2024 : मॅग्नस कार्लसन ठरला विजेता…
जीएम अरविंद चिदंबरम (5.5 गुण) शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये केवळ अर्धा गुण मिळवू शकला, ज्यामुळे तो 13 व्या क्रमांकावर राहिला. याव्यतिरिक्त अभिमन्यू पुराणिक (5.5 गुण), पी इनियान (5.5 गुण) हे अनुक्रमे 14 व्या आणि 17 व्या क्रमाकांवर राहिले.