पोलीस नाईकांची वेतनाची समस्या सोडवणार

शिवेंद्रसिंहराजे भोसले; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 

सातारा – राज्य पोलीस दलातील पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नूतन वेतनश्रेणीतून वगळण्यात आल्याने त्यांना विशेष वेतनापासून वंचित रहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या विशेष वेतनाची समस्या सोडवणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची ग्वाही माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. पोलीस शिपाई, पोलीस नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांवर असं”य कर्मचारी नियुक्त आहेत.

महाराष्ट्र शासनाने पोलीस दलाला सातवा वेतन आयोग लागू केला आहे. बक्षी आयोगाच्या शिफारशींनुसार पगारवाढ देण्यात आली आहे. वेतन आयोग लागू होण्यापूर्वी पोलीस शिपाई, पोलीस नाईक, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना दरमहा 750 रुपये विशेष वेतन देण्यात येत होते. नूतन वेतनश्रेणी लागू करताना केवळ पोलीस नाईकपदावरील कर्मचाऱ्यांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना विशेष वेतन सुरू ठेवण्यात आले आहे. राज्यात एकूण पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 30 टक्‍के कर्मचारी पोलीस नाईकपदावर काम करत आहेत.

इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलीस नाईकांनाही विशेष वेतन सुरू राहिले पाहिजे, या मागणीसाठी काही कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नुकतीच भेट घेतली. पोलीस नाईकांवरील अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस यांची लवकरच भेट घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. अहोरात्र जनतेची सुरक्षा आणि सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर शासनाकडून कोणताही अन्याय होता कामा नये यासाठी आग्रही भूमिका घेऊ, असेही ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)