मंचर -कळंब (ता.आंबेगाव) येथील कमलजादेवी मंदिराला पोलिसांनी भेट दिली असून, दानपेटी, दागिने ग्रामसमिती किंवा मंदिर समितीने ताब्यात घेऊन सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन केले आहे.
श्रीक्षेत्र ओझर येथील गणपती मंदिरात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर मंचर पोलीस सावध झाले आहे.
कळंब येथे पोलीस जवान राजेंद्र हिले यांनी आदिशक्ती कमलजादेवी मंदिराला भेट देऊन येथे असणाऱ्या मंदिरातील दानपेटी, दागिने गावातील ग्राम कमिटीने ताब्यात घेऊन बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याबाबत सूचना केल्या.