पुणे – पोलीस उपनिरीक्षकाने राजू पवार यांनी करोनावर मात केली आहे. बरे झाल्यानंतर पुन्हा ते कर्तव्यावर हजर झाले. त्यावेळी पोलीस आणि नागरिकांनी टाळ्या वाजावर आणि अंगावर फुलाची उधळण करत त्यंचे स्वागत केले.
संपूर्ण जगच करोनाच्या विळख्यात आहे. महाराष्ट् पोलीस दलातील पुणे शहर दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये नियुक्तीस असणार पवार यांना कर्तव्यावर असताना करोना संसर्गाची बाधा झाली.
त्यांनी अत्यंत धीराने या आजारावर उपचार घेऊन स्वतःची व्हील पॉवर जागृत करून, या गंभीर आजारपणावर मात करून पुन्हा पुणे शहर पोलीस दलात सेवेत पदार्पण केले आहे.