– राजेंद्र वाघमारे
नेवासा – कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवून नेवासकरांना मनमोकळ्यापणाने मोहिनीराज महाराज याञोत्सवाचा आनंद लुटता आल्याने नेवासा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक विजय करे यांच्यावर हिंदु – मुस्लीम समाजाकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
दोन्ही समाजाकडून याञा उत्सव शांततेत पार पडल्यामुळे पो.नि.विजय करे यांचा सन्मान केला जात आहे माणसातल माणूसपण ओळखून खाकी वर्दीतही त्यांनी माणुसकीचा झरा असल्याचे दाखवून देवून आपल्या गोड शैलीतून कायद्याचे रक्षण करत याञा उत्सव मोठ्या शांततेत पार पाडल्यामुळे नेवासकरांतून पो.नि.करे व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पद्स्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी जगाच्या नकाशावर धार्मिक क्षेञ म्हणून ओळख आहे माञ गृहखात्याच्या पोलीस दप्तरी या शहराची नोंद संवेदनशिल शहर म्हणून झालेली आहे काही अपवाद वगळता सर्वच समाज गुण्यागोविंदाने नांदत असतांना सार्वजनिक कार्यक्रम गेले दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बंद होते.
यंदाच्या याञोत्सवात मोठ्या संख्येने नागरीक सामिल झालेले होते माञ कायदा व सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि.करे यांच्यावर असल्याने आणि याञा कमिटीच्या सदस्यांनी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्तव्य बजावत होते.
पो.नि.करे यांनी याञा काळात चोख बंदोबस्त बजावत राञ् अन् दिवस चोख बंदोबस्त बजावत नेवासकरांना याञेचा मोठा आनंद लुटता आल्यामुळे नेवासकरांच्या गळ्यातील पो.नि.करे सध्या ‘ताईत’ बनले असून खाकी वर्दीवाल्याकडे बघून दरारा नव्हे तर, आपुलकीची भावना त्यांनी निर्माण केल्यामुळे पो.नि.करे यांच्यासह पोलीसांवर सध्या नेवासकरांतून अभिनंदनाचा वर्षाव सुरु असून पोलीस निरिक्षक करे यांचा सर्वपक्षीय व सर्वधर्मियांकडून सत्कार होत असून अभिनंदन केले जात आहे.