पिंपरी, प्रतिनिधी) – आगामी निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन टोळ्यांना मोक्का लावला आहे. तीन सराईतांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तर 17 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पिंपरी, वाकड, निगडी पोलीस ठाण्यातील तीन टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोक्का) अंतर्गत, वाकड, दिघी आणि पिंपरी मधील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तर वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड आणि पिंपरी परिसरातील तब्बल 17 गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई केली आहे.
या टोळ्यांवर मोका
पिंपरी परिसरातील गुन्हेगार सुरज उत्तम किरवले (टोळी प्रमुख – वय 24, रा. घरकुल, चिखली), यश ऊर्फ पाशा कैलास भोसले (वय 21), अविनाश प्रकाश माने (वय 22), गणेश जमदाडे (सव रा. पिंपरी) यांच्या विरूध्द खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, पिस्तुल बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
वाकड परिसरातील गुन्हेगार रोहीत मोहन खताळ (टोळी प्रमुख – वय 21), ऋषीकेश हरी आटोळे (वय 21), अनिकेत अनिल पवार (वय 27), गणेश बबन खारे (वय 26), अजय भिम दुधभाते (वय 22), मुन्ना एकनाथ वैरागर (वय 21), शिवशंकर शामराव जिरगे (वय 22, सर्व रा. थेरगाव), साहील हानीफ पटेल (वय 21, रा. पर्वती, पुणे), शुभग चंद्रकांत पांचाळ (वय 23), प्रितम सुनिल भोसले (वय 20, दोघेही रा. काळेवाडी), सुमित सिद्राम माने (वय 23, रा. रहाटणी), कैवल्य दिनेश जाधवर (वय 19, रा. उंड्री, हडपसर) यांच्या विरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, पिस्तुल बाळगणे असे एकूण 19 गुन्हे दाखल आहेत.
निगडी परिसरातील गुन्हेगार अमन शंकर पुजारी (टोळी प्रमुख – वय 22), शिवम सुनिल दुबे (वय 21), रत्ना मिठाईलाल बरुड (वय 36, सर्व रा. आकुर्डी) यांच्या विरोधात कट करुन खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे, हत्यारे जवळ बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
तीन सराईत कारागृहात स्थानबद्ध
वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे (रा. काळेवाडी) याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे (रा. दिघी) याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील दिपक सुरेश मोहिते (रा. पिंपरी) याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
17 गुन्हेगार तडीपार
तडीपार गुन्हेगाराचे नाव (पत्ता, तडीपारीचा कालावधी)
वाकड पोलीस ठाणे
आनंद किशोर वाल्मिकी (वय 29, रा.वाकड. 2 वर्ष)
आशिष एकनाथ शेटे (वय 24, रा.रहाटणी. 1 वर्ष)
महाळुंगे पोलीस ठाणे
संकेत माणिक कोळेकर (वय 22, रा.धामणे. 1 वर्ष)
चिखली पोलीस ठाणे
आकाश बाबु नडविन मणी (वय 21, रा.चिखली. 2 वर्ष)
देहूरोड पोलीस ठाणे
रोहित उर्फ गब-या राजस्वामी (वय 22, रा.देहुरोड. 1 वर्ष)
ऋषिकेश उर्फ श-या अडागळे (वय 24, रा.देहूरोड. 2 वर्ष)
पिंपरी पोलीस ठाणे
सुरज रामहरक जैस्वाल (वय 21, रा.पिंपरी. 2 वर्ष)
शुभम राजु वाघमारे (वय 22, रा.पिंपरी. 2 वर्ष)
वृषभ नंदू जाधव (वय 21, रा.चिंचवड. 2 वर्ष)
शेखर उर्फ बका बाबु बोटे (वय 20, रा.चिंचवड. 2 वर्ष)
शुभम अशोक चांदणे (वय 19, रा.चिंचवड. 2 वर्ष)
शांताराम मारुती विटकर (वय 34, रा.चिंचवड. 2 वर्ष)
अनुराग दत्ता दांगडे (वय 19, रा.चिंचवड. 2 वर्ष)
सागर ज्ञानदेव ढावरे (वय 20, रा.पिंपरी. 2 वर्ष)
पंकज दिलीप पवार (वय 32, रा.चिंचवड. 2 वर्ष)
सोन्या उर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे (वय 21, रा.चिंचवड. 2 वर्ष)
आनंद नामदेव दणाणे (वय 31, रा.चिंचवड. 2 वर्ष)