जळोची- बारामती तालुका पोलिसांनी ठीक ठिकाणी गावठी दारू अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत १३३ लिटर गावठी व देशी-विदेशी दारूसह दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख ३१ हजार ८१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील पारवडी, तांदुळवाडी, घाडगेवाडी, झारगडवाडी, माळेगाव, सोनगाव, निरावागज, कटफळ याठिकाणी सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापे टाकून अवैद्य दारू विक्रेत्या अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शुभम संजय शिंदे,(रा. पारवडी), अलका रामचंद्र दुबळे,(रा. तांदुळवाडी.), गिताबाई अशोक आढागळे,(रा.रा. तांदुळवाडी.), चेतन बाळू जाधव(रा. माळेगाव), विजय जनार्दन पवार,(रा. माळेगाव.बु,), बाळासाहेब अनिल सावंत (रा. माळेगाव. बु.), रोहिदास रामचंद्र मदने,( घाडगेवाडी,), नाना कुंडलिक सोनवणे,( झारगडवाडी,), आकाश दादासाहेब देवकाते,(रा. निरावागज. ), दिपाली विजय भिसे,( कटफळ. ), वसंत दत्तात्रय गोफणे,( सोनगाव.) या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून हे सर्व बारामती तालुक्यातील रहिवाशी आहेत.