शाहूपुरी परिसरात पोलिसांची स्वच्छता मोहीम

दोनशे पोलिसांचे पाच तास श्रमदान

कोल्हापूर  (प्रतिनिधी) – महापुरामुळे कोल्हापुरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्‍टर अभिनव देशमुख यांच्यासह दोनशे पोलिसांनी आज पाच तास श्रमदान करून शाहूपुरी कुंभार गल्ली बसंत बहार रोड येथील वीस डंपर कचरा गोळा करून रस्ता स्वच्छ केला गेला. कायदा व सुव्यवस्था राखत याबरोबरच स्वच्छता मोहीम राबवून पोलिसांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहराला मोठा फटका बसला आहे. व्हीनस कॉर्नर शाहूपुरी कुंभार वसाहत नागाळा पार्क जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात आठ दिवस पुराचे पाणी साठवण होते. सध्या पूर ओसरला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

महापालिका जिल्हा प्रशासन काही सामाजिक संस्था यांच्यामार्फत जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवून रस्ते व परिसर स्वच्छ केला जात आहे. यामध्ये पोलिस प्रशासनानेही आपले दैनंदिन काम बाजूला ठेवून स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कसबा बावडा परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.