वाकडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग

पिंपरी – शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली. ही घटना मानकर चौक, वाकड येथे शनिवारी (दि. 17) पहाटे घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3.45 वाजताच्या सुमारास मानकर चौक, वाकड येथे एमएच-42-एक्‍यू-9096 या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

आगीची माहिती मिळताच रहाटणी आणि अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. 20 मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत ट्रकचे केबिन जळून खाक झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.