पुणे – करोना च्या पार्शवभूमीवर पुण्य मध्ये लोकडाऊन मध्ये नागरिकांना रोजच्या गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या परिस्थितीमध्ये बुधवार पेठेतील देवदासी भगिनींची परिस्थिती अधिक बिकट आहे बुधवार पेठेतील देवदासी आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीयेत.
त्याचीच दखल घेऊन पुणे पोलीस आयुक्त्यालयाच्या परिमंडळ १च्या उपयुक्त स्वप्ना गोरे यांच्या पुढाकाराने तसेच साद प्रतिष्ठान च्या सहकार्याने आज बुधवार पेठेतील देवदासी महिलांना अन्न धान्याचे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या वेळी टोकन पद्धतीने अतिशय शिस्तीत या सर्व महिलांना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले.
या वेळी परिमंडळ १च्या उपयुक्त स्वप्ना गोरे ,सहायक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे,फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगनाथ कळसकर ,सहायक पोलिस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी यांच्या सह अधिकारी व कर्मचारी तसेच साद प्रतिष्ठान चे अमित ढोले,आदित्य तापडिया उपस्थित होते