नवी दिल्ली- लोकांचा असा समूह जो अल्लाह आणि दीनचा प्रचार-प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह म्हणजे तबलीगी जमात. मरकज म्हणजे केंद्र.
तबलीगी जमात ही एक धार्मिक संस्था आहे. 1926 सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. इस्लामचे अभ्यासक मौलाना मुहम्मद इलियास यांनी ही संस्था स्थापन केली होती.
तबलीगी मरकज म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचे केंद्र आहे. 15 वर्षापुर्वी मेवात मधील मौलाना इलियास साहेब यांनी मरकजची स्थापना केली होती. इस्लाम धर्मातील व्यसनी तरुणांनाही या ठिकाणी पाठवलं जातंं. त्यांना चांगली शिकवण मिळावी आणि धर्मप्रचार व्हावा हाच या मरकजचा मुख्य हेतू असतो.