शिक्रापूर -सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका युवकाने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. संदीप सानप (रा. शिरासमार्ग बीड) असे या युवकाचे नाव आहे. त्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात
गुनप्हा दाखल करण्यात आला आहे. सणसवाडी येथील पीडित महिलेचा मोबाइल नंबर संदीप सानपने मिळविला होता. वारंवार महिलेला फोन करुन, मेसेज करून जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान महिलेने तिच्या पतीला याबाबत सांगितले.
महिलेच्या पतीने काही मित्रांच्या ओळखीतून संदीपला समजावून सांगितले. यानंतर 29 मार्च रोजी महिला घरात असताना संदीप तेथे आला आणि त्याने महिलेला दमदाटी करत महिलेचा मोबाइल जमिनीवर आपटून फोडला, विनयभंग केला.
त्यानंतर तू माझ्याशी बोलणार नसेल तर मी जीवाचे बरे वाईट करतो असे म्हणून खिशातून विषारी औषधाची बाटली काढून प्राशन केले. महिलेने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करत पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला अन् शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले.