यंत्रणा विकसीत करण्याची नवी योजना
पुणे : इलेट्रिक बसनध्ये प्रवाशांना रांगेतून प्रवेश देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची योजना पुणे महानगर परिवहन महामंडळाने आखली आहे. मात्र, ही योजना कितपत यशस्वी होईल, याबाबत काही अधिकारीच साशंक आहेत.
इलेक्ट्रिक बस रस्त्यातच बंद पडत आहेत. अतिरिक्त भारामुळे त्या बंद पडतात. प्रवाशांची अतिरिक्त संख्येमुळे त्या ओव्हरलोडेड होतात, असे अनुमान आहे. त्यामुळे रांगेने प्रवेश दिल्यास अतिरिक्त प्रवाशांना रोखणे शक्य होईल. त्यातून बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण रोखता येईल, अशी अपेक्षा आहे.
ही योजना अर्थातच सध्या चर्चा आणि नियोजनाच्या पातळीवर असून त्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईळ अशी माहिती पीएमपीएमएलच्या वरीष्ठ सुत्रांनी दिली. तर काही अधिकाऱ्यांच्या या योजनेच्या अममलबजावणीत काही समस्या आहेत. प्रवाशांची संख्या पाहता या योजनेच्या यशस्वितेबाबत साशंक आहोत असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन योजनेत बस वाहक बसमध्ये किती प्रवाशांना घ्यायचे याचा निर्णय घेऊ शकेल, अशी व्यवस्था या यंत्रणेत बसवण्यात येणअर आहे. बस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी केल्यास प्रवाशांना अधिक उत्तम सेवा देता येईल.