मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती थांबविण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ मैदानात उतरले आहेत. पक्षातील गळती रोखण्याबरोबरच विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार येत्या मंगळवारपासून (17 सप्टेंबर) राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पवार सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
पहिल्या टप्प्यात पवारसाहेब सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. pic.twitter.com/u7iPdoKAfA
— NCP (@NCPspeaks) September 14, 2019