“शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी राजे भाजपात”

मुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसेले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल. तसेच महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे आणि जार त्याला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही हणून पाडू असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

मलिक पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना खासदार केले. त्यांना खासदार केल्यानंतरही ते वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा आईच्या माध्यमातून पवारांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल. 1999 च्या पराभवाची त्यांना आठवण करून देऊ. ते कुठल्या पद्धतीने कामे करतात. रात्री व दिवसा कुठल्या अवस्थेत असतात हे सातारा जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी पॉट निवडणुकीत जागा मात्र आम्हीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)