U14 Championship Series Tennis Tournament : – शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे आयोजित शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात जान्हवी चौगुले हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
मुख्य ड्रॉच्या मुलांच्या गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात तिसऱ्या मानांकित सर्वज्ञ सरोदेने सहाव्या मानांकित आरव पटेलचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या लढतीत नमिश हुड याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या अधिराज दुधानेचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात पाचव्या मानांकित प्रार्थना खेडकर हिने शर्मिष्ठा कोद्रेचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तिसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेने दुसऱ्या मानांकित स्वरा जावळेचे आव्हान 6-2, 6-2 असे मोडीत काढले.
BWF Swiss Open 2024 : पी.व्ही. सिंधूसह लक्ष्य सेन, श्रीकांतची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक…
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित आरुष पोतदार व आरव पटेल या जोडीने चौथ्या मानांकित तनिश पाटील व लक्ष्य त्रिपाठी यांचा 6-1, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित प्रजीतरेड्डी मदिरेड्डी व अंशुल पुजारी यांनी सुजय देशमुख व नमिश हुड यांचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात जान्हवी चौगुले हिने सारा फेंगसेच्या साथीत अवंतिका सैनी व रेवा भातखळकर यांचा 6-1, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.