‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमा बायोपिक नसून ‘संतचरित्र’-निवडणूक आयोग

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनात दिवसेंदिवस चांगलेच अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे हा सिनेमा सध्या तरी प्रर्शनाच्या मार्गावर दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. मात्र, १७ एप्रिलला निवडणूक आयोगाने हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी आपले मत मांडले आहे. हे बायोपिक नसून एक ‘हेजियोग्राफी’ (संतचरित्र) असल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. त्यामुळे हा सिनेमा या व्यक्तीला ‘संतांचा’ दर्जा प्राप्त करून देऊन शकतो.

निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमा पाहिल्यानंतर २२ एप्रिलला आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे याबद्दलचा सीलबंद अहवाल सोपवला. आपल्या या अहवालात निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिलेल्या स्थगितीचे समर्थन केले आहे. अहवालानुसार, सिनेमामध्ये सकारत्मक बाबी असून, हे एक संतचरित्र असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका संपल्याशिवाय या सिनेमाला प्रदर्शनाची परवानगी देता येणार नाही, यावर आयोगाने जोर दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.