सन्मानाची वागणूक देत नसाल तर निवडणुकीची कामे देऊ नका ; शिक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर: निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना कोल्हापुरातील गडहिंग्लज इथं झालेल्या धक्काबुक्की  घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिल. तसंच निवडणुकीचं  काम करणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी, सतेच संबंधित प्रांताधिकारी यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली. शिवाय आम्हाला सन्मानाची वागणूक देता येत नसेल तर निवडणुकीची कामे देऊ नका असेही शिक्षकांनी म्हंटले आहे.

कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना मंगळवारी घडली. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही ठरलेल्या प्रमाणे 2200 रुपये न देता केवळ तीनशे रुपये देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. जाब विचारत असतानाच पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय संबंधित प्रांताधिकारी यांनी सुद्धा आमच्याशी सन्मानपूर्वक वागणूक दिली नसल्याचे शिक्षकांनी म्हंटले आहे.

त्यानुसार आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन संबंधीत घटनेची चौकशी व्हावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. शिवाय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा या घटनेची चौकशी करू असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त शिक्षक शांत झाले आहेत. शिक्षकांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांची दिलगिरी व्यक्त करत पुन्हा असा प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे आश्वासन दिले

काय आहे हे प्रकरण –

गडहिंग्लज येथे मंगळवारी 100 हून अधिक शिक्षकांना निवडणुकीच्या कामासंदर्भात रिझर्व (राखीव) ठेवण्यात आले होते. राखीव शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांना झोनल ऑफिसर यांच्यासोबत कामगिरी देण्यात आली व बहुतांश शिक्षकांना 22 तारीख व 23 तारखेला पूर्णवेळ रात्री अकरा वाजेपर्यंत गडहिंग्लज येथे निवडणूक कार्यालयात थांबून घेण्यात आले. निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर दहा वाजता भत्ता मागत असताना भत्ता देय नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आले. अशावेळी काही शिक्षक घरी निघून गेले. पण बऱ्याच शिक्षकांनी भत्त्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु याला कुठलीही दाद प्रशासनाकडून दिली नसल्याची तक्रार येथील शिक्षकांनी केली. यावेळी याची विचारणा करत असताना अचानक एका पोलिस अधिकाऱ्याकडून भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की झाली. हा संपूर्ण प्रकार एका शिक्षकाने आपल्या कॅमेरात कैद केला. यावेळी सर्व शिक्षकांनी आपली एकजूट दाखवून पोलिसांची अरेरावी खपवून घेतली नाही. सर्वांनी याला विरोध करत प्रशासनाला शासनाने दिलेल्या नियमानुसार 2200 रुपये भत्ता देण्यास भाग पाडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.