आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धा : राहुल अवारे आणि दिपक पुनियाने पटकावले कांस्यपदक

जियाम (चीन) – आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी भारतीय मल्लांनी आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे कुस्तीमध्ये भारताच्या नावावर आता एकूण 5 पदके झाली आहेत. भारताच्या राहुल अवारे आणि दिपक पुनिया यांनी आपपल्या गटात कांस्यपदक पटकावले आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल अवारे याने स्पर्धेत 61 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या किम जिनकोएल याला 9-2 अशा गुणफरकाने हरवत कांस्यपदक प्राप्त केले. तर दिपक पुनिया याने 86 किलो वजनी गटात तजाकिस्तानच्या बखुदूर कोदिरोव याचा 8-2 ने पराभव करत कांस्यपदक पटकाविले आहे.

दरम्यान, भारताने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत तीन पदके पटकावली होती. यामध्ये बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्ण, प्रवीण राणाने 79 किलो वजनी गटात रौप्यपदक आणि सत्यव्रत कादियान याने 97 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.