राहुल गांधींना करोना बाधा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट; म्हणाले…

नवी दिल्ली – काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांना करोना बाधा झाली आहे. याबाबतची माहिती राहुल गांधी यांनी स्वतः ट्विट करत दिली. राहुल गांधी यांना करोना विषाणूची बाधा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी यांना करोना बाधा झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरद्वारे ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी लिहतात, “लोकसभा खासदार राहुल गांधीजी यांच्या आरोग्यसाठी व ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”

दरम्यान, राहुल गांधी यांना करोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणं जाणवल्याने त्यांना चाचणी केली होती. यानंतर त्यांची करोना चाचणी सकारात्मक आली. गांधी यांनी, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.