Lok Sabha Election 2024: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षीयांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्तेत असलेल्या भाजपनेही याची जोरदार तयारी सुरु केलीय. दरम्यान, शुक्रवारी (22 डिसेंबर) भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिक निवडणुकांबाबत पक्ष कार्यकर्त्यांना आपली सर्व शक्ती पणाला लावावी, असे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एक नवीन घोषणाही केली आहे. “सपने नहीं हक़ीक़त बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं”. अशी ही नवीन घोषणा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या धर्तीवर सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप उमेदवारांची घोषणा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकते.