Instagram updates – मेटा ने इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता इंस्टाग्राम वापरकर्ते व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारखे पाठवलेले संदेश संपादित करू शकतात. इंस्टाग्रामने या फीचरची माहिती खूप आधी दिली होती आणि या फीचरची चाचणी खूप दिवसांपासून सुरू होती.
इन्स्टाग्रामवर पाठवलेला मेसेज एडिट करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, याचा अर्थ तुम्ही मेसेज कधीही एडिट करू शकणार नाही. नवीन अपडेटनुसार, तुम्ही इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत एडिट करू शकाल. हे फीचर अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्रामवर आहे.
इंस्टाग्राम आणखी एक मोठे अपडेट रिलीज करणार आहे. इंस्टाग्रामच्या या नवीन अपडेटनंतर, वापरकर्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने फोटोचे बॅकग्राउंड बदलता येईल. परंतु सध्या या फिचरची चाचणी केली जात आहे.
इंस्टाग्रामकडून या नवीन फीचरला ‘बॅकड्रॉप’ असे नाव देण्यात आले आहे. मेटाच्या जनरेटिव्ह एआयचे प्रमुख अहमद अल धले यांनी ही माहिती दिली आहे. सध्या, बॅकड्रॉप फिचर फक्त यूएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.