PM Modi Narendra – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Narendra) उद्या, गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
तसेच शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन आणि शेतकऱ्यांना “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील. याशिवाय निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.
शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे.