गोवा :- गोव्यात सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानी रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सोनेरी यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या महिला संघात रिचा चोरडिया, संयुक्ता काळे, निशिका काळे, किमया काळे यांचा समावेश आहे. या संघास मधुरा तांबे यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 240.90 गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. या प्रकारत जम्मू काश्मीर संघाला रौप्य पदक मिळाले तर हरियाणा संघाला ब्रॉंझ पदक मिळाले.
19 आॅक्टोबरपासून स्पर्धा सुरू झालेली स्पर्धा 9 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. ही स्पर्धा 19 आॅक्टोबरपासून सुरू झालेली असली तरी सदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजे 26 आॅक्टोबर रोजी होणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे भव्य स्वरुपात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार, इतर मंत्री, आमदार व देशातील प्रसिद्ध क्रीडापटू उपस्थित राहणार आहे.