पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेने पुन्हा एकदा प्लेटफॉर्म तिकीटाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. नातेवाईक, मित्रमंडळींना सोडविण्यासाठी किंवा नेण्यासाठी रेल्वे स्थानकात येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील अधिक आहे. तर कन्फर्म आणि आरएसी तिकिट असणान्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्याची आणि रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. यामुळे अनावश्यक गर्दा वळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाच्या रकमेत वाढ केली आहे.